Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज १ जून रोजी (शनिवार) मतदान होत आहे. देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागा मतदानाला सामोरी जात आहे. अखेरच्या टप्प्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मतदानाची मॅरेथॉन प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. सकाळी सात वाजल्यापासून सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यात पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व ४ जागांसाठी अखेरच्या टप्प्यात मतदान होत आहे. उत्तरप्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशातील ६ आणि झारखंडमधील ३ जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. त्याशिवाय, चंदिगढमधील एकमेव जागेसाठीही मतदान पार पडले जात आहे. नुकतेच माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी जालंधर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यानंतर त्याने मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा हरभजन सिंग म्हणाला की, “मला आशा आहे की लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी येतील. जालंधरमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे अशी माझी इच्छा आहे. हे आपले कर्तव्य आहे. असे सरकार आणले पाहिजे जे लोकांसाठी काम करू शकेल. मी अजिबात व्हीआयपी नाही, व्हीआयपी संस्कृती संपली पाहिजे, जर कोणी लंगरसाठी रांगेत उभे राहू शकत असेल तर तो येथेही उभा राहू शकतो,” असे म्हणत त्याने मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. Lok Sabha Election 2024|