पंतप्रधानांकडून देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा ; वाचा राहुल गांधी काय म्हणाले ?

Happy New Year 2026। आज जगभरात नवीन वर्ष साजरे केले जात आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त, मुंबई, बेंगळुरू आणि लखनऊसह प्रमुख शहरे नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले.
यानिमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक प्रमुख नेत्यांनी देशवासियांना २०२६ या वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना २०२६ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केलीय.ज्यामध्ये त्यांनी, “२०२६ साठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हाला चांगले आरोग्य आणि समृद्धी देईल. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळो आणि तुमची सर्व कामे पूर्ण होवोत. आपल्या समाजात शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करतो.”असं म्हटलंय.
2026 की आप सभी को बहुत-बहुत शुभकामनाएं। कामना करते हैं कि यह वर्ष हर किसी के लिए नई आशाएं, नए संकल्प और एक नया आत्मविश्वास लेकर आए। सभी को जीवन में आगे बढ़ने की प्रेरणा दे।
ज्ञानं विरक्तिरैश्वर्यं शौर्यं तेजो बलं स्मृतिः।
स्वातन्त्र्यं कौशलं कान्तिर्धैर्यं मार्दवमेव च ॥ pic.twitter.com/vMhlHe3fGR
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2026
राहुल गांधी काय म्हणाले ? Happy New Year 2026।
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही आपल्या देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले, “तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंद, चांगले आरोग्य आणि यश देईल.”
आप सभी को नववर्ष की हार्दिक शुभकामनाएं। नया साल आपके जीवन में ढेर सारी खुशियां, अच्छा स्वास्थ्य और सफलताएं लेकर आए।
Wishing everyone a very Happy New Year 2026! pic.twitter.com/DqJYctGyM6
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2025
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी प्रसिद्ध केले पत्र Happy New Year 2026।
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या देशवासियांना २०२६ च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहिले. हे पत्र सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी, “प्रिय देशवासियांनो, या शुभ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण हे वर्ष दुर्बल घटकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक जनआंदोलन बनवूया: काम करण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार आणि सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकार. आपल्या संविधानाचे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी, नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि समाजात सुसंवाद बळकट करण्यासाठी एकत्र काम करूया.”असे लिहिले.
मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले,”तरुणांसाठी रोजगार, महिलांसाठी सुरक्षितता, शेतकऱ्यांसाठी समृद्धी, उपेक्षितांसाठी आदर आणि सर्वांसाठी चांगले राहणीमान हा आपला सामान्य संकल्प असावा. येणारे वर्ष तुम्हा सर्वांना आनंद, समृद्धी आणि प्रगती घेऊन येवो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा”





