मुंबई – भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘शिल्पा शेट्टी’ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये ती मकर संक्रांतीच्या आणि पोंगलच्या आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिल्पाने मराठमोळ्या अंदाजात आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दिसायला सुंदर असलेली शिल्पा स्वत:च्या आरोग्याची आणि फिटनेसचीदेखील तेवढीच काळजी घेते. म्हणून शिल्पा नेहमीच आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर तिचे अनेक योगा आणि वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते.