Happy Birthday : प्रख्यात अभिनेत्री, प्रतिभावंत कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस, पाहुयात तिचे काही ग्लॅमरस फोटो

मुंबई – मराठी चित्रपटश्रुष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ‘स्पृहा जोशी’ नेहमीच आपल्या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते.
मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट यामध्ये स्पृहाने साकारलेल्या विलक्षण भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहे.
‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची स्पृहाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे.
स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. तिचे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात.
दरम्यान, स्पृहाने नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर असून, त्यात ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. स्पृहा या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.





