मुंबई – बोल्ड आणि बिनधास्त बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री ‘सनी लिओनी’चा आज वाढदिवस आहे. सिनीने आपल्या बोल्ड अंदाजानी नेटिझन्सना अक्षरक्षः वेड लावलं आहे. ‘जिस्म 2’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. बिग बॉस-5 या रियालिटी शोमुळे सनी मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात आली.
‘करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून सनीनं आपल्या संपूर्ण जीवन प्रवास लोकांसमोर आणला. तिचा हा जीवनप्रवास रसिकांनीही डोक्यावर घेत एकप्रकारे स्वीकारला. इंडो-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात एक पॉर्नस्टार आहे.
सनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला की त्यावर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत असतो. सध्या लॉकडाउन मुळे सनी लिओनी तिचा नवरा डेनियल वेबर व तीन मुलांसोबत लॉस अँजेलिसमध्ये आहे. सनी 3 मुलांची आई आहे. यामध्ये एक मुलगी तर दोन मुलगे आहेत.
View this post on Instagram
The chaos of colors!! 🎉 Lips:Fusion of #CherryBomb and #WildCherry by @starstruckbysl #SunnyLeone