मुंबई – कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेले दहावी, बारावीचे निकाल पुढील महिन्यात जाहीर करण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. काल राज्यातील शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत झालेल्या महत्वपूर्ण निर्णयानंतर आज दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्याबाबतची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थी वर्गाची चिंता कमी झाली आहे.
मंत्री गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १५ जुलैपर्यंत तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केला जाणार असून दहावीचे निकाल लावल्यानंतर ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरु करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येतोय.