अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद – हिमानी परब
Updated On:

नवी दिल्ली – अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा सर्वाधिक आनंद आहे. मल्लखांबमध्ये सातत्याने केलेल्या अथक मेहनतीची तसेच मिळालेल्या यशाची दखल घेतली गेली त्याचेच सर्वाधिक समाधान आहे, अशा शब्दात महाराष्ट्राची अव्वल महिला मल्लखांबपटू हिमानी परब हिने अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
दोन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या जागतिक अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत चार सुवर्ण आणि दोन ब्रॉंझपदकांची प्राप्ती केल्यामुळे मला हा पुरस्कार गेल्या वर्षीच मिळेल अशी अपेक्षा होती. पण यंदा अखेर हा पुरस्कार मिळाला त्यामुळे आता नवी प्रेरणा मिळाली आहे.
येत्या काळात नवोदितांना या खेळाकडे वळवून त्यांच्यातूनच नवा विजेता घडवण्याचे माझे लक्ष्य राहील, असेही तीने सांगितले. मल्लखांब क्रीडा प्रकारात हा पुरस्कार मिळवणारी हिमानी देशाची पहिलीच महिला मल्लखांबपटू ठरली आहे.





