‘मोदी-शाह हे शत्रू’, पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘हमास’ची दहशतवादी संघटनांसोबत बैठक, व्हीडिओ व्हायरल

Hamas News| पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (PoK) आयोजित भारतविरोधी परिषदेत हमासचे नेते सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. हमासच्या नेत्यांना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांकडून व्हीआयपी वागणूक देण्यात आली. याशिवाय, या कार्यक्रमदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शत्रू घोषित करण्यात आले. या घटनेचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकव्याप्त काश्मीर मधील रावलकोट येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जैश-ए-मोहम्मदसोबतच लष्कर-ए-तैयबा आणि पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमासचेही नेते सहभागी झाले होते.
Another big achievement for Pakistan!
Hamas joins hands with terror org Jaish e Muhammad and Lashkar e Tayyiba in Rawlakot of Pakistan Occupied Jammu & Kashmir. Jaish terrorist announces that Hamas and Pak Jihadi groups have united.pic.twitter.com/QDcAEwFQbl
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 5, 2025
न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात दहशतवादी संघटनांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शत्रू घोषित करण्यात आहे. याशिवाय, जैशचा एक नेता काश्मीरसाठी संघर्ष करण्याबाबत बोलतानाही एका कथित व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आता हमासला जैश-ए-मोहम्मदसोबत मिळून काश्मीरसाठी लढा देण्यास प्रवृत्त करत आहे. या कार्यक्रमात जैश, लष्कर-ए-तैयबा आणि हमास एकामंचावर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच, जैशचे दहशतवादी हमासच्या नेत्यांना सुरक्षा देखील पुरवत होते.
हमास आतापर्यंत इस्त्रायल-पॅलेस्टाइन संघर्षावर लक्ष केंद्रित करत आला आहे. मात्र, आता जर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय होत असल्यास पाकिस्तानच्या दहशतवादाला यामुळे फायदा मिळू शकतो.





