Celina Jaitly post : अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या पतीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या १५ वर्षांनंतर तिने तिचा पती पीटर हागवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अशातच अभिनेत्रीने इंन्स्टाग्रावरून एक पोस्ट शेअर करत तिने मोठा खुलासा करत स्वतः काही प्रश्नांची विचारणा करत एक पोस्ट शेअर केलीआहे. या पोस्टसोबत तिने एक फोटो देखील शेअर केला आहे. (Celina Jaitly Post) “मी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे. पहिल्या घटनेनंतर मी का सोडले नाही? किंवा दुसऱ्या… तिसऱ्या घटनेनंतर. मी आंधळी होते का? कमकुवत होते का? की मला त्याची सवय झाली होती?” असे प्रश्न तिने स्वतः केले आहेत. (Celina Jaitly Post) पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, अपमान कधीकधी हिंसाचाराने सुरू होतो. तो प्रेमाने सुरू होतो. तुम्हाला वाटते की तुम्ही भविष्य घडवत आहात. मग काहीतरी बदलते. चांगले दिवस येतात. जवळजवळ वास्तविक वाटणारा बदल. मग आशा व्यसनाधीन होते. अपमान दुखावत नाही. आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. तुम्ही जुळवून घेता. मग तुम्ही आणखी जुळवून घेता, मग तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता. असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. View this post on Instagram A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial) या पोस्टमधून सेलिना जेटलीला असे म्हणायचे आहे की, खूप पूर्वीपासून पतीच्या गोष्टी चुकीच्या होत्या. पण काही कारणांमुळे ती वेगळी होऊ शकली नाही. तिला वाटले होते की काळानुसार हळूहळू गोष्टी पण तसे झाले नाही. सेलिनाने तिच्या पतीविरुद्ध दाखल केला खटला (Celina Jaitly Post) गेल्या वर्षी सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हागविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. तिने नुकसानभरपाई आणि मुलांच्या ताब्यासाठी ५० कोटींची भरपाई मागितली होती. तिने तिच्या पतीवर शारीरिक आणि लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, ज्यामुळे तिला ऑस्ट्रियातील तिचे घर सोडून भारतात परतावे लागले. तिची कायदेशीर लढाई सुरू असून मुले सध्या ऑस्ट्रियामध्ये पीटर हागसोबत राहत आहेत. हेही वाचा : Amruta Khanwilkar : ‘चंद्रमुखी’ने घेतले तिरुपती बालाजीचं दर्शन; अमृताने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना