40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती
मुंबई : मुंबईच्या डोंगरी भागात एक चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली 40 ते 45 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफचे जवानदेखील घटनास्थळी पोहचले आहेत. या इमारतीत 10 ते 15 कुटुंब राहत होती. चिंचोळ्या गल्ल्या आणि गर्दीच्या परिसरामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.