वॉशिंग्टन : अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील सदस्यत्वासाठी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणूकीत प्राथमिक फेरीमध्ये सुमारे डझनभर भारतीय वंशाच्या उमेदवारांपैकी निम्म्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामध्ये ऍमी बेरा आणि रो खन्ना यांच्यासह अन्य दोन महिलांचाही समावेश आहे.
कॅलिफोर्नियामध्ये बेरा आणि खन्ना यांनी आपापल्या सातव्या आणि 17 व्या जिल्ह्यात सहज विजय मिळविला. दोघेही डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहामध्ये प्रदीर्घकाळ काम करणारे भारतीय-अमेरिकन नागरिक, 55 वर्षांचे बेरा हे सलग पाचव्यांदा प्रतिनिधीत्वासाठी प्रयत्न करत आहेत.
तर 43 वर्षीय खन्ना हे सलग तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी होण्यासाठी निवडणूकीला उभे होते. मात्र त्यांना भारतीय-अमेरिकन वंशाचे रितेश टंडन या रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराने आव्हान दिले होते.
टंडन यांना भारतीय अमेरिकन गताने समर्थन दिले असून खन्ना यांना विरोध केला आहे. टंडन हे प्रायमरीसाठी दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, नोव्हेंबरच्या निवडणुकीत, अग्रक्रमाच्या दोन उमेदवारांची नावे मतपत्रिकेवर असणार आहेत.
रिपब्लिकन निशा शर्मा यांनी कॅलिफोर्नियाच्या 11 व्या कॉंग्रेसयनल जिल्ह्यामधून प्राथमिक फेरी जिंकली. नोव्हेंबरच्या निवडणुकीत त्या लोकशाही पदावर असलेल्या मार्क डीसौलनिअरला आव्हान देतील. डेमोक्रॅटिक ऋषी कुमार हे कॅलिफॉर्नियातील 18 व्या जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाच्या अन्ना जी ईशू यांना आव्हान देणार आहेत.
तर व्हर्जिनियाच्या 11 व्या जिल्ह्यात मंगा अनंत तुला यांनी रिपब्लिकन प्रायमरी जिंकली आहे. त्या आता सहावेळा डेमोक्रॅटिक सदस्य राहिलेल्या जेरी कोनोली यांना आव्हान देतील. प्रिस्टन कुलकर्णी यांनी टेक्सासमधील 22 व्या जिल्ह्यात मोठा विजय मिळवला.