‘आयएसआय’ला गोपनीय माहिती पुरवणारा नाशिकचा तरूण अटकेत

नाशिक – पाकिस्तानच्या आयएसआय ला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. दिपक सिरसाठ (वय 41) असं या आरोपीचं नाव आहे.

आरोपी दिपक हा नाशिकच्या एरोनाॅटिक्स लिमीटेड या कंपनीत कार्यरत होता. तो काही दिवसांपासून पाकिस्तानच्या आय.एस.आय गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात होता.

भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानंच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, नाशिक येथील हिंदुस्थान एरोनाॅटिक्स लिमिटेड या विमान कारखाण्याची गोपनीय माहिती तो आयएसआयला पुरवत होता. त्यावरून दिपकला अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून 3 मोबाईल, 5 सीमकार्ड, 2 मेमरी कार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आरोपी विरूद्ध कलम 3,4 आणि 5 शासकीय गुपिते अधिनियम, 1923 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.