हज यात्रेकरूंचा प्रवास होणार आणखी सुखकर: नवीन ऍप लॉंच

नवी दिल्ली : हज यात्रेकरूंना प्रवासादरम्यान होणारा त्रास आता कमी होणार आहे. कारण यासाठी अत्याधुनिक सुविधा पुरविणारे नवीन ऍप लॉंच करण्यात आले आहे. काऊंसिल जनरल ऑफ इंडियाकडून हे ऍप लॉंच करण्यात आले आहे. इंडियन हाजी इनफोरमेशन सिस्टीम या नावाने हे ऍप लॉंच करण्यात आले आहे.

लॉंच करण्यात आलेल्या या ऍपच्या माध्यमातून हजला जाणाऱ्या विमानाच्या माहितीपासून मदिनामधील लोकेशनपर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. स्टेट हज कमिटीचे सचिव राहुल गुप्ता यांनी याविषयी माहिती दिली आहे. या ऍपच्या माध्यमातून हज सेवकांच्या संपर्कातदेखील राहण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच हज यात्रेकरूंना या ऍपविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी थेट भारतीय हज कार्यालयाशी संपर्क साधावा असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, या ऍपमध्ये यात्रेकरूने आपला पासपोर्ट क्रमांक, कव्हर आणि मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक असून हे केल्यानंतर हे ऍप सक्रिय होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.