मुसळधार पावसामुळे हडपसर जलमय; अवघ्या अर्ध्या तासात रस्त्यांवर पाण्याची तळी

Updated On:
मुसळधार पावसामुळे हडपसर जलमय; अवघ्या अर्ध्या तासात रस्त्यांवर पाण्याची तळी

हडपसर – शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीन असा अवघ्या अर्ध्या तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हडपसर जलमय झाले. पुणे-सोलापूर महामार्ग ठिकठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.

आज दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान अचानक मुसळधार पाऊस पडला. यामध्ये अमर बाग येथील चौक, रामोशी आळीकडे जाणारा रस्ता, मगरपट्टा चौक आणि लोहिया उद्यान समोरील रस्ता आणि अनेक अंतर्गत रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागली. हडपसर गावातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते.

तर पुणे-सोलापूर महामार्गावर अमरबाग येथे साचलेल्या पाण्यातून वाहने पुढे घेताना अडथळा निर्माण झाल्याने काही तास वाहतूक कोंडी झाली होती. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने पार्कींग केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune : हात धुण्याची सवय ठरतेय आरोग्याची ढाल; 15 ऑक्टोबरला ‘जागतिक हात स्वच्छता दिन’

2026-10-15 16:03:45

Pune : हात धुण्याची सवय ठरतेय आरोग्याची ढाल; 15 ऑक्टोबरला ‘जागतिक हात स्वच्छता दिन’

Uttarakhand Weather : उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट; मुख्यमंत्री धामींचे अधिकाऱ्यांना 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश

2026-09-25 20:04:43

Uttarakhand Weather : उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट; मुख्यमंत्री धामींचे अधिकाऱ्यांना 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश

pune : भरपावसातही देखावे पाहण्यासाठी उत्साह

2026-09-23 07:55:49

pune : भरपावसातही देखावे पाहण्यासाठी उत्साह

Holystico Astrana : होलिस्टिको अ‍ॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

2026-09-11 16:28:37

Holystico Astrana : होलिस्टिको अ‍ॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

Pune : पुणेकरांनो, उद्या 2 तास हा महत्त्वाचा रस्ता बंद! दिवेघाटात ब्लास्टिंग; जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा

2026-09-10 22:48:48

Pune : पुणेकरांनो, उद्या 2 तास हा महत्त्वाचा रस्ता बंद! दिवेघाटात ब्लास्टिंग; जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा