हडपसर | अनाथालयातील मुलांनी घेतला खाऊ गल्लीतील पदार्थांचा आस्वाद

हडपसर : पाणी-पुरी, जिलेबी, वडा पाव, समोसा ,भेळ असा खाऊ गल्लीत मिळणाऱ्या पदार्थांची चव आज शंभूराजे आश्रमातील शेकडो अनाथ मुलांना चाखता आली. निमित्त होते सामाजिक दातृत्व जपत दिया फाउंडेशनकडून उद्योगपती विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
शंभूराजे आश्रमातील बालकांसाठी आयोजित केलेल्या खाऊ गल्लीच्या उपक्रमाचे.
“आपण आपल्या स्वतःच्या लहान मुलांना चटपटीत खाण्यासाठी खाऊ गल्ली अथवा चौपाटीवर नेत असतो ,पण अनाथ मुलांना देखील कधीतरी भेळ,समोसा, वडापाव, इडली, उडीद वडा ,जिलेबी,पाणी पुरी यांचा आस्वाद घेता यावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन मित्र विनोद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केले होते.
– इम्रानभाई शेख(अध्यक्ष,दिया फाउंडेशन हडपसर)
यावेळी दिया फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रानभाई शेख,स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष शीतल शिंदे,भाजपचे योगेश सूर्यवंशी,मनोज खुडे यांच्या समवेत दिया फाउंडेशनचे सदस्य मतीन शेख,रवी पवार,तौफिक शेख,अक्षय बहिरट, इम्रान पानसरे,अस्लम सय्यद, बाळासाहेब साबळे,साहिल शेख आदी उपस्थित होते.





