हडपसर: ‘शिवसाई’च्या ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
Updated On:

मांजरी – मांजरी बुद्रुक येथील शिवसाई महिला नवरात्र उत्सव कमिटी व माजी उपसरपंच अमित घुले यांच्यावतीने परिसरातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या हळदी-कुंकू कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला.
येथील अमित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालय शेजारील मैदानात हा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी व खबरदारी घेत वेगवेगळे रकाने करण्यात आहे होते. ते संपूर्ण खचाखच भरून गेले होते. यानिमित्त उपस्थित हजारो महिलांना आकर्षक भेटवस्तू भेट देण्यात आल्या. यात परिसरातील सुमारे चार ते पाच हजार महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. शिवसाई महिला नवरात्र उत्सव कमिटी व माजी उपसरपंच अमित घुले आणि मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन केले.





