Lara Dutta: कैकेयी नसती तर रामायण घडलंच नसतं! लारा दत्तानं मांडली कैकेयीची बाजू; म्हणाली, ‘तिचा निर्णय केवळ स्वार्थासाठी नव्हता’
Lara Dutta दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल बोलताना तिनं कैकेयीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. आतापर्यंत कैकेयीला अनेकदा नकारात्मक पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. मात्र, तिच्या निर्णयामागे केवळ राग किंवा सत्तेची लालसा नव्हती, असं लाराचं म्हणणं आहे.

Lara Dutta: रामायण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, रावण आणि हनुमान यांची पात्रं उभी राहतात. या कथेत कैकेयी या पात्रालाही विशेष महत्त्व आहे. मात्र, रामाला १४ वर्षांचा वनवास देण्यामागे कैकेयीचाच हात असल्याने आजही अनेकांच्या मनात तिची प्रतिमा नकारात्मक आहे. पण कैकेयी खरोखरच स्वार्थी आणि क्रूर होती का? की तिच्या निर्णयामागे काही वेगळी कारणं होती? बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिनं याच प्रश्नावर आपलं मत मांडलं आहे. विशेष म्हणजे, तिच्या मते कैकेयीने रामाला वनवासात पाठवलं नसतं, तर रामायणाची कथा आज आपल्याला जशी माहिती आहे तशी घडलीच नसती. (Lara Dutta)
कैकेयीच्या भूमिकेबद्दल काय म्हणाली लारा दत्ता? (Lara Dutta)
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल बोलताना तिनं कैकेयीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. आतापर्यंत कैकेयीला अनेकदा नकारात्मक पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. मात्र, तिच्या निर्णयामागे केवळ राग किंवा सत्तेची लालसा नव्हती, असं लाराचं म्हणणं आहे.
एका मुलाखतीत लारानं कैकेयीच्या व्यक्तिरेखेतील अनेक पैलू उलगडले. तिच्या मते, कैकेयी ही एक आई होती. आपल्या मुलाला त्याचा हक्क मिळावा, यासाठी ती प्रयत्न करत होती. तिच्या मनात रामाबद्दल प्रेम होतं; मात्र दुसरीकडे मुलगा भरतच्या भविष्याचीही तिला चिंता होती.

Lara Dutta: कैकेयी नसती तर रामायण घडलंच नसतं! लारा दत्तानं मांडली कैकेयीची बाजू; म्हणाली, ‘तिचा निर्णय केवळ स्वार्थासाठी नव्हता’
राजा दशरथानं दिलेली दोन वचनं ठरली महत्त्वाची (Lara Dutta)
लारानं मुलाखतीत कैकेयी आणि राजा दशरथ यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला. रामायणातील कथेनुसार, एकदा युद्धभूमीवर कैकेयीनं राजा दशरथ यांचा जीव वाचवला होता. तिच्या या कृतीमुळे आनंदी झालेल्या दशरथानं तिला दोन वरदान देण्याचं वचन दिलं होतं.
याशिवाय, कैकेयीच्या लग्नाआधीही दशरथानं तिच्या वडिलांना एक महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं. कैकेयीचा मुलगा भरत हा अयोध्येचा राजा होईल, असं वचन दशरथानं दिल्याचं कथेत सांगितलं जातं. त्यामुळे भरतला त्याचा हक्क मिळावा, अशी कैकेयीची अपेक्षा होती.
लाराच्या मते, कैकेयीसमोर एकीकडे रामावरील प्रेम आणि दुसरीकडे स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जबाबदारी असं मोठं द्वंद्व होतं. त्यामुळे तिच्या निर्णयाकडे केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.
भरतच्या हक्कांसाठी कैकेयीचा निर्णय? (Lara Dutta)
लारा दत्तानं सांगितलं की, कैकेयीची भूमिका साकारणं तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. कैकेयीला भीती होती की, अयोध्येतील राजकारण आणि दरबारातील घडामोडींमध्ये भरतला त्याचा हक्क मिळणार नाही. त्यामुळे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी तिनं आवाज उठवला.
कैकेयीच्या निर्णयामागे आई म्हणून असलेली चिंता, दशरथ यांनी दिलेली वचनं आणि भरतच्या हक्कांचा विचार अशा अनेक गोष्टी होत्या. त्यामुळे या व्यक्तिरेखेकडे अधिक समजून घेऊन पाहण्याची गरज असल्याचं लाराला वाटतं.
कैकेयीचा निर्णय नसता तर रामायणाची कथा वेगळी असती! (Lara Dutta)
लारानं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तिच्या मते, कैकेयीनं रामाला वनवासात पाठवलं नसतं, तर रामायणाची कथा आज आपल्याला माहीत आहे तशी घडलीच नसती. कारण राम वनवासात गेल्यानंतरच सीतेचं अपहरण, रावणाशी युद्ध आणि पुढील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या.
त्यामुळे रामायणातील कैकेयीची भूमिका केवळ एका खलनायिकेपुरती मर्यादित नाही. तिच्या एका निर्णयामुळे संपूर्ण कथेला वेगळं वळण मिळालं. लारा दत्ताच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा कैकेयीच्या व्यक्तिरेखेची आणि तिच्या निर्णयामागील कारणांची चर्चा सुरू झाली आहे.





