Haansika Motwani And Sohael Khaturiya : सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीने चार वर्षांपूर्वी बिझनेसमन सोहेल खतुरिया याच्याशी विवाह केला होता. हंसिका आणि सोहेल यांच्या रॉयल विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, लग्नाच्या चारच वर्षांत दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाकडूनही दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. हंसिका मोटवानीच्या घटस्फोटाच्या बातमीनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील वांद्रे इथे असलेल्या कौटुंबिक न्यायालयाने हंसिका आणि सोहेल यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. हे जोडपं क्षुल्लक गोष्टींवरून वारंवार वाद घालत असे. शिवाय, या दोघांची लाईफस्टाईल एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याने एकत्र राहणं या दोघांसाठीही अशक्य झालं, ज्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे म्हंटले जात आहे. मात्र हंसिका आणि सोहेल यांनी अद्याप अधिकृतरित्या वेगळे झाल्याची घोषणा केलेली नाही. Haansika Motwani And Sohael Khaturiya Haansika Motwani And Sohael Khaturiya : दरम्यान, हंसिका आणि सोहेल यांनी डिसेंबर 2022 मध्ये जयपूर येथील ‘मुंडोटा फोर्ट अँड पॅलेस’मध्ये एका भव्य समारंभात आपली लग्नगाठ बांधलेली. दोघांच्या विभक्त होण्याबाबतच्या चर्चा गेल्या वर्षांपासून समोर आल्या होत्या. हंसिकानं इन्स्टाग्राम हँडलवरून सोहेलसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलिट केले होते. तेव्हाच चाहत्यांना शंका आली होती. Haansika Motwani And Sohael Khaturiya आता या जोडप्यानं आपले मार्ग वेगळे केले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, हे सोहेलचं दुसरं लग्न होतं. हंसिकापूर्वी त्याचे लग्न रिंकी बजाज हिच्याशी झालं होतं. हेही वाचा: Shivsena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी