पिंपरी | अरविंद एज्युकेशन सोसायटीत गुरुपौर्णिमा साजरी

सांगवी, (वार्ताहर) – पिंपरी | अरविंद एज्युकेशन सोसायटीत गुरुपौर्णिमा साजरीयेथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिक स्कुल, भारतीय विद्यानिकेतन प्रशाला आणि ए. ई. एस. ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी गुरुपूजन पालकांचे गुरुमंत्राच्या संगीतमय वातावरणात पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व वेद व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांचे व आई-वडिलांचे मोठ्या सन्मानाने पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
या उपक्रमामुळे पालक भारावून गेले. विद्यार्थ्यांनी गुरूवंदना, ‘गुरूचे महत्त्व’ ही नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आपल्या मनोगताद्वारे आदरभाव व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी स्वतः पालकांचा सन्मान करण्यासाठी ‘सर्वश्रेष्ठ आई-बाबा’ ही सन्मानचिन्हे बनविली होती. मराठी, हिंदी या दोन्ही भाषेतील हस्ताक्षर स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी आपले हस्त कौशल्य दाखवून दिले.
शिक्षिका प्रतिभा ओक, खुशबू तारळकर, सायली पवार, सीमा हवालदार, इशिता परमार, स्वप्ना जाणूनकर, तनुजा ववले, शिक्षिका स्वाती तोडकर, सोनिया गुरूंग, रीमा पटेल, लखवीर कौर, मंजुषा भाग्यवंत, नीलम सावंत यांनी गुरू पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, नीलम पवार, आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता अमोलिक, स्वाती तोडकर, दीपा गायकवाड यांनी, तर आभार शिक्षिका सुमित्रा कुंभार यांनी मानले.





