Pimpri : पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

पिंपरी : व्ही.एच बी.पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.”गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा” या उद्घोषाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्त श्री दत्तात्रयांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. जगन्नाथ काटे व प्राचार्या प्रा. डॉ. धनश्री सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी वेदांगी सातपुते व जुही शर्मा तसेच चौथीच्या वेदिका पारखे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या भाषणातून उलगडले. विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प व लेखनसामग्री देऊन गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्या प्रो. डॉ. धनश्री सोनवणे यांनी आपले विचार मांडताना गुरूंचे जीवनातील स्थान अधोरेखित केले. संस्थापक प्रो. डॉ. जगन्नाथ काटे यांनी शिष्य भक्त पुंडलिक व भगवान पांडुरंग यांच्या उदाहरणातून गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रज्ञा अमृतकर यांनी केले, तर फलक लेखन जयश्री घोलप व साक्षी शिंदे यांनी, आणि आभारप्रदर्शन मोनाली चौधरी यांनी केले.





