“राष्ट्रवादी’ला बाजूला ठेवत गुंड यांची कार्यकर्ता बैठक

मंजुषा गुंड उमेदवारीच्या दावेदार
मेळाव्यातील भूमिकेकडे तालुक्‍याचे लक्ष 

कर्जत – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुंड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा बाजूला ठेवून शनिवारी मित्र मंडळाच्या नावाने कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुळधरणच्या मंजुषा लॉन्स येथे गटातील कार्यकर्त्यांचा हा मेळावा दुपारी चार वाजता होणार आहे. राजेंद्र गुंड यांच्या पत्नी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड या विधानसभेसाठी दावेदार आहेत.मात्र मतदार संघात रोहित पवार यांची जोरदार तयारी व ब्रॅंडिंग सुरू आहे. त्यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. या परिस्थितीत राजेंद्र गुंड यांनी पहिल्यांदाच पक्षाला बाजूला ठेवून मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे मेळाव्यात ते नेमकी कोणती भूमिका मांडतात.

याकडे तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे. कोपर्डीचे माजी सरपंच सुर्यभान सुद्रिक यांनी पाच दिवसांपूर्वी कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार हा गुंड कुटुंबातीलच असावा, असे म्हणत आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा दिला होता. गुंड यांचे निष्ठावंत असलेले सुद्रिक यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली होती. राजेंद्र गुंड यांनी त्याच दिवशी सिद्धटेक येथे हे आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ती बैठक तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र मंडळाची असल्याचे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांच्या बैठक आयोजनाची जोरदार तयारी करण्यात आली असून गटातील सर्व गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

गुंड यांनी काही वर्षांपूर्वी भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड यांचे विखे कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. गुंड हे अनेक वर्षांपासून आमदारकीची स्वप्न पाहत आहेत. कुळधरण गटावर त्यांचे अनेक दशके निर्विवाद वर्चस्व आहे. गुंड यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली. त्यांनी उमेदवारीसाठी मुलाखतही दिलेली आहे.

सुद्रिक यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मेळाव्यात गुंड काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचे आहे. रोहित पवार यांची मतदारसंघात सुरू असलेली जोरदार तयारी आणि अजित पवार यांचा गुंड यांना पाठिंबा यामध्ये नेमके काय दडले आहे याचा निष्कर्ष काढणे सध्या तरी अवघड आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)