Gunaratna Sadavarte । मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व आमदार उपस्थित आहेत. सध्या राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं आणि हे विधेयक एकमताने मंजूर झाले. आता मुख्यमंत्री हे विधेयक विधान परिषदेत मांडणार आहेत. मात्र, अश्यातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ( Gunaratna Sadavarte )
यावेळी बोलताना सदावर्ते म्हणाले की, “कोणत्या आधारावर आर्थिक मागासलेपणाला सामाजिक मागासलेपणामध्ये रूपांतरित करत आहात. सर्वोच न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत, ज्यामध्ये अशा प्रकारची कृती म्हणजेच मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन त्या निकालामध्ये जी काही गाईडलाईन तत्त्व सांगितली होती.
त्या गाईडलाईन्सचा चकनाचुर या बिलाच्या माध्यमातून केला आहे. मुळातच मराठा समाज सामाजिक मागास आहे हे दाखवण्यासाठी जो संदर्भ दिला गेला तोही चुकीचा आहे. हा चुकीचा संदर्भ अशा एका व्यक्तीच्या हातात देण्यात आला. जे निवृत्त न्यायाधीश शुक्रे आहेत ते मराठा आरक्षणवादी कार्यकर्ते असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
“हे आरक्षण आम्हाला मान्य नाही’ – मनोज जरांगे पाटील ( manoj jarange patil )
मराठा आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना, ‘ राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो. पण हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. आम्ही इथून आधीही स्वागत केलं होतं. आताही स्वागत करतो. आमचं म्हणणं आहे.
आमच्या हक्काचं आरक्षण द्या. सगेसोयरेची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. आधीही सांगितलं होतं की हे नाकारण्याचा काही कारणच नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.