थायलंडच्या मॉलमध्ये “गन ड्रामा’

सैनिकाच्या बेछुट गोळीबरत 17 ठार
परिसराची नाकाबंदी; कारवाई सुरू

बॅंकॉक : थायलंडच्या ईशन्येकडील एका प्रसिद्ध शॉपिंग मॉलमध्ये एका सैनिकाने केलेल्या बेछुट गोळीबारामध्ये किमान 17 जण मरण पावले आहेत. या मॉलमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली आहे. हा सैनिक देखील याच मॉलमध्ये असल्याने त्याला पकडण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मॉलमध्ये 16 ते 20 जणांना ओलीस ठेवण्यात आले असल्याचा अंदाज आहे. या घटनेमध्ये 10 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत, असे रॉयल थाई पोलिस प्रवक्ते कृसाना पट्टनाचारोईन यांनी सांगितले. जखमींची एकूण संख्या त्वरित कळू शकली नाही.

शहराबाहेर तैनात असलेल्या शिपायाने सुरुवातीला दुसरा एक सैनिक आणि एका महिलेची गोळ्या घालून हत्या केली आणि तिसऱ्या व्यक्तीला जखमी केले, असे पोलिसांना फोन वरून कळवणाऱ्या व्यक्‍तीने सांगितले होते. हे शहर कोरात म्हणूनही ओळखले जाणाऱ्या शहरात या सैनिकाने त्याच्या तळावरून एक बंदूक घेतली आणि टर्मिनल 21 मॉलकडे गेला. या मॉलच्या वाटेवर असतानाच त्याने गोळीबार सुरू केला होता.

या मॉलबाहेरच्या व्हिडीओच्या क्‍लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. या हल्लेखोराला पकडण्याचा आणि मॉलमध्ये अडकलेल्या व्यक्‍तींना सोडवण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. या हल्लेखोराचे नाव जक्रपंथ थॉम्मा असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल कोंगचीप तंत्रवानीच यांनी सांगितले. पोलिस आणि लष्करी तुकडींनी मॉल आणि आसपासच्या भागाची नाकाबंदी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

फेसबुकवर पोस्ट…
बंदूकधारी व्यक्तीने फेसबुकवर स्वतःचे काही फोटोही पोस्ट केले होते आणि “मी आत्मसमर्पण करावे का’ आणि “कोणीही मृत्यूपासून सुटू शकत नाही…’ यासह अनेक पोस्ट लिहिल्या आहेत. एका फेसबुक व्हिडिओमध्ये हा हल्लेखोर लष्कराचे हेल्मेट परिधान करून, “मी थकलो आहे … मी आता माझे बोट चालवू शकत नाही’ असे म्हणताना दिसतो आहे. मात्र हा व्हिडीओ नंतर डिलीट केला गेला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.