Gulbarao Patil । जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तब्बल 1 हजार 350 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. त्यांनी राज्य सरकारकडून महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच हे एकनाथ शिंदेंनी केलं, ते बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले आणि गुलाबराव बी दाढीवाले. लाईन लगी है सब… असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमात “बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात आणि मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा. तुम्हाला करता आलं नाही. तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनच कमिशन घेता येतं. बाकी दुसरं काही करता येत नाही. कमिशनमधून थोडं वाट ना बाबा. दोन हजारांची पावती फाडतो आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हाट्सअपवर टाकतो.अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी त्यांचे राजकीय विरोधक गुलाबराव देवकर यांच्यावर केली. एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्… Gulbarao Patil । आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महिला मुलींसाठी खूप काही केला आहे. हे सरकार सुद्धा मुली आणि महिलांच्या पाठीशी उभं आहे. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी भाड्यात 50 टक्के सवलत दिली. मोठ्या आनंदात महिला भगिनी आता बसने प्रवास करतात. हे एकनाथ शिंदेंनी केलं, ते बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले आणि गुलाबराव बी दाढीवाले. लाईन लगी है सब… देशातले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, ज्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एकनाथ शिंदे दाढीवाल्याने घेतला आहे.” असे म्हणत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाही Gulbarao Patil । यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी,”लाडकी बहीण योजना सुरू केली. पैसे मिळणार नाही असं सांगितलं जात होतं. मात्र, पैसे मिळाले आता म्हणतात निवडणुकीनंतर योजना बंद होईल. अडीच वर्षे त्यांनी काय केलं नाही. मीच काय माझ्यापेक्षा ज्येष्ठ राजकारणी आहेत त्यांना पण विचारा. असा कोणता मुख्यमंत्री आहे की, तो १३ वेळेस एका जिल्ह्यामध्ये येतो. मात्र, जळगाव जिल्ह्यामध्ये आले त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे. देण्याची दानत माझ्या नेत्यांमध्ये आहे आणि हेच गुण आमच्या मध्ये आहे. जसं पाण्याचा उगम होतो आणि ते वाहत राहतं त्या पद्धतीने एकनाथराव शिंदे आमचा स्त्रोत आहे आणि त्या ठिकाणाहून आमचा उगम झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. महिलांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाही. कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं तर दीड हजाराचे तीन हजार रुपये करण्याची ताकद आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवली आहे, “असे त्यांनी यावेळी म्हटले.