बोदवड : राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुका सुरु आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेत एकमेकांवर टीका करतांना राजकीय नेते दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ते सभेत बोलतांना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत तडाखेबाज भाषण केलं. म्हणाले, गेली तीस वर्षे एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात 30 वर्ष वर्ष होतो. मात्र कुठलीही विकासकामे झाली नसून घराणेशाही झाल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी खडासेंवर केली आहे.
ते म्हणाले,’गेले तीस वर्ष जो पिक्चर तुम्ही पाहिला तरी तुम्ही बोर होत नाही, आता मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हा सरळ चालणारा हिरो आहे. तेव्हा आता शिवसेनेचा पाच वर्षांचा पिक्चर पाहा. आमचे कोणतीही बाप, दादा ग्रामपंचायतीचा मेंबर नव्हता आणि आम्ही धोकेबाज किंवा गद्दार पण नाही’ असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता खडसेंना चिमटा काढला.