नारायणगाव – येथे लायन्स व लिओ क्लब ऑफ जुन्नर-शिवनेरी, तसेच ग्रामोन्नती मंडळातर्फे भव्य सायकल स्पर्धा घेण्यात आली, अशी माहिती लायन्स अध्यक्ष ऍड. हेमंत भास्कर व प्रोजेक्ट इन्चार्ज संदीप मुथ्था यांनी दिली. या स्पर्धांचे उद्घाटन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, शशिकांत वाजगे, अभय शास्त्री, सभापती संजय काळे, निवृत्ती काळे, संतोष खैरे, योगेश कदम, सुनील सुखात्मे, मनोज भळगट उपस्थित होते. स्पर्धेत 15 शाळेतील 197 स्पर्धकांनी भाग घेतला. बक्षीस वितरण युवानेते अमित बेनके, जुन्नरचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, रोहिदास केदारी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पंच म्हणून एच. पी. नरसुडे, आर. एस. नवले, बी. जी. गुळवे, एस. एस. गाळव, अजय कानडे, डी. के. वळकुंदे, संतोष भालेराव, अमित झरेकर, तुळशीदास कोऱ्हाळे यांनी केले. यशस्वी खेळाडूंना 39 हजारांची रोख बक्षिसे, सन्मान चिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचलन दीपक वारुळे आणि एच. पी. नरसुडे यांनी केले, तर मच्छिंद्र मुंडलिक यांनी आभार मानले.