गुजरातच्या मिठाची निर्यात वाढली

अहमदाबाद – गुजरातमध्ये निर्माण होणारे मीठ सध्या युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये विकले जात आहे.
देशात गुजरातमध्ये सर्वाधिक प्रमाणात मीठ तयार केले जाते. बहुतांश मिठाचे उत्पादन कच्छ आणि परिसरात केले जाते. मागील 3 वर्षांमध्ये तेथील मिठाला जगभरात मान्यता मिळाली आहे. गुजरातमधील मीठ खाद्यपदार्थांची चव वाढविण्यासाठी नव्हे तर अन्य कारणासाठी वापरले जाते आहे.

अमेरिका, युरोप आणि आशियातील काही देशांमध्ये हिमवृष्टी होते. तेथील रस्त्यांवरील बर्फ हटविणे अवघड असते. अशा ठिकाणी यापूर्वी रसायनांचा वापर केला जायचा. आता त्यांची जागा गुजरातच्या मिठाने घेतली आहे. मिठाचा मारा करताच बर्फ वेगाने वितळू लागतो. सोडियम क्‍लोराईडमुळे रस्त्यांवरून वाहने घसरण्याचा धोका राहात नाही. यापूर्वी गुजरातमधून कमी गुणवत्तेचे मीठ पाठविले जायचे. पण आता या देशांमध्ये चांगल्या दर्जाचे मीठ पाठविण्यात येत आहे.

मागील 3 वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या मिठाची निर्यात दुपटीपेक्षाही अधिक वाढल्याची माहिती इंडियन सॉल्ट मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनने दिली आहे. 2015-16 मध्ये गुजरातमधून चीनमध्ये निर्यात करण्यात आलेल्या मिठाचे प्रमाण 22.17 लाख टन होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×