Gujarat Titans : गुजरात टायटन्समध्ये ‘गुरू’ची एन्ट्री; नेहराच्या मदतीला आला ‘हा’ धाकड खेळाडू

सध्या आयपीएल 2025 शेवटच्या टप्प्यात आली आहे. आज लीग स्टेजमधील शेवटचा सामना आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडणार आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेतील टॉप – 2 मधील दुसरा संघ ठरणार आहे. पंजाबने टॉप – 2 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावर सगळ्यांचे लक्ष असणार आहे. आज आरसीबीचा पराभव झाला तर गुजरात टॉप – 2 मध्ये पोहोचेल आणि जर आरसीबी जिंकली तर ती टॉप – 2 मध्ये पोहोचेल. यादरम्यान गुजरात टायटन्सच्या मदतीला एक धाकड खेळाडू धावून आला आहे. कोण आहे हा खेळाडू? जाणून घेऊया…
गुजरात टायटन्समध्ये ‘गुरू’ची एन्ट्री
गुजरात टायटन्सने युवराज सिंग आणि शुभमन गिलचा एकत्र चालतानाचा एक फोटो शेअर केला आहे. गुजरातने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शनमध्ये “की हालचाल, #TitansFAM?” असं लिहिलं आहे. या फोटोमुळे युवराजच्या संभाव्य भूमिकेबद्दल अनेक तर्कवितर्क लावलं जात आहेत. गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केलं आहे. ते महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लनपूर येथे क्वालिफायर 1 किंवा एलिमिनेटरमध्ये खेळतील.
Ki haal chaal, #TitansFAM? 😍 pic.twitter.com/yhnPEZTdJr
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 26, 2025
युवराजचे नेहरा आणि शुभमन दोघांसोबत चांगले संबंध आहेत. विशेषतः कोविड-19 महामारीच्या काळात त्याने शुभमनला त्याच्या फलंदाजीचे कौशल्य सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. युवराज सिंगबद्दल बोलायचे झाले तर त्याने टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि दोन आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. त्याचा हा अनुभव गुजरातच्या संघाला प्लेऑफमध्ये नक्कीच उपयोगी पडेल.





