Santosh Deshmukh Case | बीडच्या मस्साजोगमधील संतोष देशमख हत्या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. याप्रकरणातील 3 फरार आरोपींपैकी 2 जणांना अटक करण्यात आले आहे. मात्र एकजण अजूनही फरार आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली. मात्र संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्यानंतर ते कसे पसार झाले आणि त्यांनी काय प्रयत्न केले हे समोर आले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुलेने त्यांच्या साथीदारांसह गुजरातला पलायन केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. याद्वारे आता आरोपींचे गुजरात कनेक्शन समोर आले आहे. Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख यांची हत्या केल्यावर मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि साथीदार बीडमधील वाशी या गावामधून फरार झाले. पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त केला होता. त्यामुळे आरोपींनी आपल्या गाड्यांचा वापर केला नाही. मुख्य तीन आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी जंगलातील रस्त्याने निघायचं ठरवलं. Santosh Deshmukh Case | गुजरातमधील मंदिरामध्ये केला मुक्काम त्यानंतर हायवेवरून खासगी ट्रॅव्हलने त्यांनी संभाजीनगर गाठलं. संभाजीनगरहून जाताना त्यांनी पुण्यातील भोसरीमध्ये ओला कॅब केली. भोसरीमधून शेअर कारने त्यांच्या गावातील मित्राकडे गेले. तिथे दीड दिवस राहिले पण माध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्याने त्यांनी राज्य सोडायचं ठरवलं. तिघांनीही गुजरातमधील गिरनार मंदिरामध्ये आपला मुक्काम हलवला. गिरनार मंदिरामध्ये तिघेही जवळपास १५ दिवस राहिले. जवळचे पैसे संपल्यावर त्यांच्यामधील कृष्णा सांगळे व्यवस्था लावण्यासाठी मंदिरातून बाहेर पाठवलं. मात्र तो ठरलेल्या ठिकाणी न परतल्याने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी पुण्याला जायचं ठरवलं. पुण्यात आल्यानंतर बालेवाडी परिसरातून एका खोलीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आरोपींचे गुजरात कनेक्शन समोर येताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आरोपी कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाही. या हत्येचा उपयोग राजकारणाकरता होऊ नये, ही अतिशय गंभीर बाब आहे,” असे देवेंद्र फडणविसांनी सांगितले आहे. Santosh Deshmukh Case | हेही वाचा: Share Market: परकीय गुंतवणुकदारांनी 3 दिवसात केली तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री, नक्की कारण काय?