Gujarat Election Result 2022 : ठरलं! BJP कडून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ बड्या नावाची घोषणा!

नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलावरुन जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपला गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे.
सध्या मतमोजणी सुरू असून भाजपने 103 जागा जिंकल्या असून 53 ठिकाणी आघाडीवर आहे. तर काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला असून 8 जागांवर आघाडीवर आहे. पाठोपाठ आप पक्षाने 4 जागांवर विजय प्राप्त केला असून एका जागेवर आघाडीवर आहे.
गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल काही क्षणात स्पष्ट होणार आहेत. अशातच आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहितीही समोर आली आहे. भाजपने याबाबतची घोषण केली आहे.
गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. गांधीनगर येथे 12 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे.
Gujarat CM will take oath at 2pm on 12th December. PM Modi and Union Home Minister Amit Shah will take part in the oath ceremony: State BJP Chief CR Patil pic.twitter.com/xEaCv7GaUo
— ANI (@ANI) December 8, 2022
विधानसभेच्या मागे असलेल्या मैदानात शपथविधी होणार आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेते सहभागी होणार आहेत.






