पिंपरी | कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुका कृषी विभागाकडून खरीप पिकाचे बियाणे वापरताना कशी काळजी घ्यावी, याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी शेतकऱ्यांसमवेत बैठक घेऊन माहिती दिली. या खरीप पिक बैठकीचे आयोजन दिवड येथे करण्यात आले होते.
यावेळी सरपंच गणेश रजिवडे, प्रकाश रजिवडे, निलेश सावळे, रामदास भैरट, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना, बियाण्यांची निवड कशी करावी, खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, घरचे बियाणे असल्यास मिठाच्या पाण्याची बिजप्रक्रिया, पीएसबी-अझो्टॉबॅक्टर बिजप्रक्रिया का करावी, याबाबतचे महत्व पटवून दिले.
गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करणे, भाताच्या तुसाचा वापर, मग्रारोहयो फळबाग लागवड नियोजन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले. पीएम किसान सेल्फ रेजिस्ट्रेशन फॉर्म जमा करण्याचीही विस्तृतपणे माहिती दिली.





