पिंपरी : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन यांच्या वतीने कायद्याचा अभ्यास व्हावा म्हणून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा सन २००५ या कायद्याबाबत शुक्रवारी (दि. २५) पिंपरीतील नेहरु नगर येथील पुरुष वकील कक्षात ॲड.प्रितिसिंह परदेशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष. ॲड. प्रताप साबळे तर प्रमुख उपस्थिती ॲड. वर्षा तिडके-कांबळे यांची होती. यावेळी बोलताना ॲड. प्रीतीसिंह परदेशी यांनी महिलांचे अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत अर्ज न्यायालयासमोर मुद्देसूद कसा दाखल करावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना असोसिशनच्या माजी महिला सचिव ॲड. वर्षा तिडके म्हणाल्या की, समाजात वावरात असताना केवळ महिलांवर नव्हे तर काही महिलांच्या चुकीच्या वागण्यामुळे आणि पैशाच्या हव्यासापोटी पुरुषांवरही अत्याचार होत असतात. त्यासाठी पुरुष संरक्षण कायद्याचीही आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. प्रताप साबळे म्हणाले की, आपण वकील म्हणून पक्षकारांसाठी काम करत असताना पक्षकार व समाजाचा मोठ्या प्रमाणावर ताण घेऊन जगत असतो. यासाठी आपण सर्वांनी कसे, आनंदी वातावरणात काम करून, आशावादी राहून पक्षकारांच्या अडचणींना हसून खेळून सामोरे जावे व ताणविरहित न्यायालयात काम करावे. तसेच दैनंदिन जीवनामध्ये महिला सुद्धा खूप तणावग्रस्त असतात. त्यांच्यासाठी सुद्धा हास्य विनोद कसे गरजेचे आहे, याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. जेणेकरून महिलांची मनस्थिती व्यवस्थित राहून घरातील वाद कलह कमी होण्यास मदत होईल. महिलांचे घरगुती अत्याचारापासून संरक्षण कसे करावे याबाबत सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानास पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, वकील विकास संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. अरुण खरात, ॲड. नागेश गर्जे,ॲड. जिजाबा काळभोर, ॲड. पूनम शर्मा , ॲड. सविता तोडकर, ॲड. शीला दळवी, ॲड. कांता गोरडे, ॲड. माधुरी महाले, ॲड. सिंधू भोंडे, ॲड. बी. के. कांबळे, ॲड. केशव घोगरे, ॲड. विशाल गभाले, ॲड. तुषार खरात, ॲड. चंद्रकांत जगदाळे, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. द्रौपदी जाधव, ॲड. डांगे, ॲड. सयाजी साळुंखे, ॲड. योगेश माळीवाडी, ॲड. अशोक रूपवते, हर्ष गोधवाणी, सिद्देश लाड यांच्यासह सर्व वकील बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमासचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अजय यादव, हिशोब तपासणीस ॲड. प्रेरणा चंदाणी, सदस्य ॲड. विजय भोंडे, ॲड. पोर्णिमा मोहिते, ॲड. सुषमा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सचिव ॲड. संदीप तापकीर यांनी केले. महिला सचिव ॲड. संगीता कुशलकर यांनी आभार केले.