पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये आल्कन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीच्या बाजूला झोपड्या करून राहणाऱ्या १५ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत असून या घडनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Maharashtra Minister Chandrakant Patil and NCP leader Supriya Sule visited the site of #PuneWallCollapse, today. 15 people had died in the incident. #Maharashtra pic.twitter.com/miXen3XchB
— ANI (@ANI) June 29, 2019
या दुर्घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच वेळी घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी सदर दुर्घटनेबाबत चर्चा देखील केली.