GT vs SRH Gujarat Titans won by 82 runs IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ५६ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८२ धावांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. गुजरातने २० षटकांत १६८ धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या ८६ धावांत गारद झाला. या विजयासह गुजरातने आता गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले असून त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदरची झुंजार अर्धशतकं – गुजरात टायटन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या २६ धावांत गुजरातने शुबमन गिल (५ धावा) आणि जोस बटलर (७ धावा) यांसारखे महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. मात्र, त्यानंतर साई सुदर्शनने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने आधी निशांत सिंधूच्या (२२ धावा) सोबतीने डाव सावरला आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरसह चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. साई सुदर्शनने ४४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली, तर सुंदरने ३३ चेंडूत ५० धावा ठोकत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. We have a new table topper ⏫@gujarat_titans wrap a massive and comprehensive 8️⃣2️⃣-run victory in Ahmedabad ✌️ Scorecard ▶️ https://t.co/o2tKKCeEaH#TATAIPL | #KhelBindaas | #GTvSRH pic.twitter.com/dJ3VQan0a1 — IndianPremierLeague (@IPL) May 12, 2026 हैदराबादचा डाव अवघ्या ८६ धावांत गारद – Brothers in arms 🫂 (and in destruction 😌) RELIVE their powerplay mayhem today ▶️ https://t.co/PFdKG8vtvN#TATAIPL | #KhelBindaas | #GTvSRH | @gujarat_titans | @mdsirajofficial | @KagisoRabada25 pic.twitter.com/zchYrfjU6o — IndianPremierLeague (@IPL) May 12, 2026 १६९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची अवस्था अत्यंत दयनीय झाली. गुजरातच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर हैदराबादचा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही. हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या १४.५ षटकांत ८६ धावांवर ऑलआऊट झाला. ज्या हैदराबादने या हंगामात अनेकदा मोठे स्कोअर उभे केले होते, त्यांना गुजरातच्या गोलंदाजांनी साधी शंभरची धावसंख्याही ओलांडू दिली नाही. या ८२ धावांच्या मोठ्या विजयाने गुजरातचा नेट रन रेटही मोठ्या प्रमाणावर सुधारला आहे. हेही वाचा – Sai Sudharsan Record : साई सुदर्शनने सलग तिसऱ्या अर्धशतकासह केला खास पराक्रम! IPL 2026 मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच शेवटच्या षटकांचा थरार आणि गुजरातची रणनीती – 5️⃣th fifty-plus score in his last 6️⃣ innings 🫡 Sai Sudharsan makes it count AGAIN 👏 Updates ▶️ https://t.co/o2tKKCeEaH#TATAIPL | #KhelBindaas | #GTvSRH | @gujarat_titans | @sais_1509 pic.twitter.com/sVPmmtIZB4 — IndianPremierLeague (@IPL) May 12, 2026 गुजरातच्या डावाच्या अखेरीस जेसन होल्डरने सुंदरच्या साथीने उपयुक्त २१ चेंडूत ४० धावांची भागीदारी केली, ज्यामुळे संघाला १६८ धावांपर्यंत पोहोचता आले. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीच्या धक्क्यातून सावरून घेतलेली ही धावसंख्या हैदराबादला रोखण्यासाठी पुरेशी ठरली. गोलंदाजीमध्ये गुजरातच्या प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका चोख बजावली, ज्यामुळे हैदराबादला डावाच्या कोणत्याही टप्प्यावर वरचढ होऊ दिले नाही. या विजयामुळे गुजरातच्या चाहत्यांमध्ये आता प्लेऑफसाठी मोठा उत्साह निर्माण झाला आहे.