GT vs CSK Gujarat Titans beat Chennai Super Kings : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामातील ६६ व्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा ८९ धावांनी दारूण पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने ४ गडी गमावून २२९ धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेचा डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. गिल-सुदर्शन आणि बटलरचे वादळ; चेन्नईचे गोलंदाज हतबल गुजरात टायटन्सला कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने पुन्हा एकदा स्वप्नवत सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १२.२ षटकांत १२५ धावांची दणदणीत भागीदारी केली. गिल ३७ चेंडूंत ६४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या जोस बटलरने साई सुदर्शनसोबत मिळून धावांचा वेग कायम राखला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ३६ चेंडूंत ८२ धावा कुटल्या. Airborne and incredible ✈️ Ft. Shubman Gill 🦸♂️ Updates ▶️ https://t.co/p5TP9NLREX #TATAIPL | #KhelBindaas | #GTvCSK pic.twitter.com/aZOiHlacdT — IndianPremierLeague (@IPL) May 21, 2026 साई सुदर्शन ५३ चेंडूंत ८४ धावांची खेळी करून बाद झाला, तर जोस बटलरने शेवटपर्यंत नाबाद राहत ५७ धावा ठोकल्या. चेन्नईकडून अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि स्पेन्सर जॉन्सन यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली. पहिल्याच चेंडूवर चेन्नईला झटका अन् रबाडा-सिराजचा कहर – Too fast. Too furious. 🏎🟀 4️⃣ wickets in the powerplay for #GT 🔥 Updates ▶️ https://t.co/p5TP9NLREX #TATAIPL | #KhelBindaas | #GTvCSK | @gujarat_titans pic.twitter.com/jSg7nlANLB — IndianPremierLeague (@IPL) May 21, 2026 २३० धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अतिशय लाजिरवाणी झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर संजू सॅमसन शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर अवघ्या २९ धावांवर चेन्नईने आपले महत्त्वाचे ३ गडी गमावले होते. या पडझडीनंतर शिवम दुबेने १७ चेंडूंत ४७ धावांची वादळी खेळी करत चेन्नईला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला, पण तो बाद होताच चेन्नईच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. हेही वाचा – Gill Sudharsan Record : गिल-सुदर्शन जोडीने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास! विराट-एबीचा ७७ मॅचेसचा रेकॉर्ड अवघ्या ४६ डावांत उद्ध्वस्त चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ १३.४ षटकांत अवघ्या १४० धावांवर आटोपला. गुजरात टायटन्सकडून धारदार गोलंदाजी करताना कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि राशिद खान या तिघांनीही प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत चेन्नईला गुडघे टेकण्यास भाग पाडले. या मोठ्या पराभवामुळे चेन्नईच्या प्ले-ऑफच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.