“जीएसटी दरकपात अन् पंतप्रधान मोदींचे फोटो लावा” ; ‘या’ क्षेत्राला केंद्र सरकारकडून आदेश

GST Price Cut । केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. जीएसटी परिषदेने ५ आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचनेला मंजुरी दिली आहे. तर, १२ टक्के आणि २८ टक्के हे कर दराचे टप्पे रद्दबातल केले आहेत. यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहे. जीएसटीच्या नव्या दरांमुळे वाहन उद्योगालाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. काही वाहनं स्वस्त होणार असून त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने देशभरातील सर्व दुचाकी व चारचाकी वाहन उत्पादक (ऑटोमोबाइल) कंपन्यांना त्यांच्या शोरूम्स व दुकानांमध्ये जीएसटी सुधारणेनंतर वाहनांच्या बदललेल्या किमतींचे पोस्टर लावावेतअसे आदेश देण्यात आले आहेत. जीएसटी सुधारणेपूर्वी वाहनांच्या किमती किती होत्या आणि आता या वाहनांच्या किमती किती आहेत असा फरक दर्शवणारे फलक/पोस्टर्स लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिझनेस स्टँडर्डने सरकारी अधिकारी व वाहन उद्योगांमधून समोर आल्या आहेत.
वाहनांच्या शोरूम्समध्ये झळकणार मोदींचे फोटो GST Price Cut ।
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्समार्फत (SIAM) हे आदेश देण्यात आले असून पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सध्या ऑटोमोबाइल कंपन्या सरकारी आदेशांनुसार पोस्टरचे डिझाईन तयार करून मंत्रालयाला मंजुरीसाठी पाठवत आहेत. या मंजुरीनंतर सर्व ऑटोमोबाइल कंपन्यां त्यांच्या शोरूम्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह वाहनांच्या जुन्या-नव्या किमतींचे पोस्टर्स लावतील.





