GST कपातीने वाहन उद्योगाला बूस्ट! दसरा-दिवाळीत छोट्या कारच्या विक्रीत 10% वाढ होणार?

GST cut boosts auto industry: जीएसटी परिषदेने बहुतांश वाहनावरील जीएसटी 28% वरून 18% इतका केला आहे. त्यामुळे वाहनांची विक्री विशेषत: छोट्या वाहनांची विक्री वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन उद्योगाने याबाबत समाधान व्यक्त केले आहे. दसरा दिवाळीला वाहनांची विक्री वाढण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.
मारुती सुझुकी कंपनीने म्हटले आहे की, गेल्या काही तिमाहीपासून वाहन विक्री कमी झाली होती. आता पुढील तिमाही पासून वाहन विक्री सात टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी वाहन विक्रेता वेग याच प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. या कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, मारुती सुझुकी कंपनीने छोट्या वाहनावरील जीएसटी कमी करण्याची मागणी बर्याच दिवसापासून लावून धरली होती. अशा परिस्थितीत छोट्या वाहनांची विक्री तर दहा टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान प्रवासी वाहन विक्री कमी होऊन 17.05 लाख युनिट इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत प्रवासी वाहन विक्री 17.31 लाख युनिट झाले होती. याचा अर्थ या क्षेत्रात काही प्रमाणात मंदी आली आहे. मात्र आता ही मंदी संपुष्टात येईल आणि ही विक्री किमान सात टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
जीएसटी कपातनिंतर समाधान व्यक्त करीत बहुतांश वहन कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या दरात कपात जाहीर केले आहे. ही कपात 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. कारण जीएसटी परिषदेने या निर्णयाच्या अंमलबजावण 22 सप्टेंबर पासून करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ शकेल असे समजले जात आहे.
दुचाकी स्वार कार खरेदी करतील –
ते म्हणाले की, एक तर अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात प्राप्त करून मर्यादा वाढवून 12 लाख इतकी केली आहे. रिझर्व बँकेने महागाई कमी झाल्यामुळे रेपो दरात कपात केल्यामुळे वाहनावरील कर्जाचा व्याजदर कमी झाला. आता पुन्हा जीएसटी परिषदेने वाहनावरील जीएसटी 18% पर्यंत कमी केला आहे. या कारणामुळे वाहन उद्योगात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत दुचाकी विकत घेणारे आता छोटया कार विकत घेण्याच्या शक्यतेवर विचार करणार आहेत. आम्ही दुचाकीस्वारांना तसे आवाहन करीत आहोत.

