Pimpri : पांगळोली धनगर वस्ती शाळेचे भूमिपूजन

कार्ला : वरसोली, पांगळोली धनगर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला वरसोली गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संजय खांडेभरड आणि उपसरपंच अरविंद बालगुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या शाळेची इमारत मोडकळीस आलेली व अत्यंत खराब स्थितीत असल्याने नवीन इमारतीची गरज होती. आता भव्य, दिव्य आणि प्रशस्त इमारत उभी राहणार असून, ही गावासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सरपंच संजय खांडेभरड यांनी यावेळी सांगितले. या इमारतीसाठी आवश्यक निधी स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्ट, वरसोली यांच्यामार्फत चेअरमन विजयजी कुकरेजा आणि सुरेखा कुकरेजा यांनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला.
ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले आणि सन्मान करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण कुटे, राहुल सुतार, विजय महाडीक, मंदा पाटेकर, नारायण पाटेकर, नलिनी खांडेभरड, रजनी कुटे, सिता ठोंबरे, मिना शिद, ग्रामसेवक दीपक शिरसाट तसेच माजी सरपंच बबन खरात, माजी उपसरपंच राजू खांडेभरड, कंत्राटदार राजू जानकर, पांडू शिद, बाळू हिरवे, संजय ठोकडे, बारकू खरात, नामदेव पाटेकर, दत्ता खांडेभरड, जिल्हा परिषद शिक्षक जितेंद्र सोनवणे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





