पिंपरी | यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
Updated On:

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी पाणी पुरवठा अभियंता अभिषेक शिंदे, आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल टकले, करसंकलन लिपिक प्रवीण माने, मयूर दिलोड, आशिष दर्शले, आदेश गरुड, बाळासाहेब पवळे, बाळासाहेब शेलार, नाईक अनिल इंगळे, कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता. या वेळी सर्वांनी पुष्पांजली समर्पित करून अभिवादन केले.





