चिंचवड : भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंचवड येथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या कार्यालयात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे, उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, सचिव मधुकर बच्चे, तसेच रवींद्र प्रभुणे, पल्लवी पाठक, दीपाली कालापुरे, पंजाबराव मोंढे, सुरभी उमदी, शिवाजी राऊत, चंद्रकांत भालके, मंगलदास खैरनार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मुखर्जी यांनी भारताच्या एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत, “एक देश, एक प्रधान, एक विधान” या घोषणेमुळे ते आजही स्मरणात राहतात, असे प्रतिपादन भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे यांनी आपल्या मनोगतात केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व मान्यवरांनीही भेट देत प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.