मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी शिवसैनिक आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आंदराजली, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आंदराजंली… #BalasahebThackeray pic.twitter.com/ksaV5LjeEk
— Narayan Rane (@MeNarayanRane) January 23, 2021
नारायण राणे यांच्याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीच ढळले नाहीत. त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.