मोठा दिलासा ! दिल्लीतील करोनाचं थैमान थांबल; २४ तासांत आढळले केवळ २३१ नवे रुग्ण

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान आता थांबण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीत आजची रुग्णसंख्या २५० च्या खाली पोहोचली आहे. तर पॉझिटीव्हीटी रेट देखील अर्ध्या टक्क्याच्या खाली आला आहे. दिल्लीकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
दिल्लीत आता ५ हजार २०८ सक्रिय रुग्ण असून होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या देखील २ हजारच्या खाली आली आहे. आरोग्य विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत दिल्लीत २३१ करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. आता करोनाचा पॉझिटीव्हीटी दर ०.३६ टक्क्यावर आहे. रविवारी हा दर ०.५० टक्के होता.
Delhi reports 231 fresh COVID cases (positivity rate – 0.36%), 876 patient recoveries, and 36 deaths in the last 24 hours.
Active cases: 5,208
Total discharges: 13,99,640
Death toll: 24,627 pic.twitter.com/nNzuEoVCt0— ANI (@ANI) June 7, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, आज ८७ रुग्ण करोनामुक्त झाले. दिल्लीतील आतापर्यंतची करोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ लाख २९ हजार ४७५ झाली असून होम आयसोलेशनमध्ये १३ लाख ९९ हजार ६४० रुग्णांनी करोनावर मात केली. तर एकूण मृतांचा आकडा २४ हजार ६२७ वर पोहोचला आहे.





