Naomika Saran and Agastya Nanda | अभिनेते राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांचा ‘आनंद’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही हा चित्रपट तेवढ्याच आवडीने पाहिला जातो. या अभिनेत्यांनंतर त्यांची पुढची पिढी देखील आता बॉलीवूडकडे वळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश खन्ना यांची नात नओमिका सरन आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचा एकत्र चित्रपट येणार आहे. या चित्रपटात रोमान्स आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे. नओमिका सरन ही राजेश खन्ना यांची मुलगी रिंकी खन्ना यांची मुलगी आहे. तर अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा यांचा मुलगा आहे. हे दोघेही आता नव्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मॅडॉक फिल्म्सतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तर किस्मत, किस्मत 2, शड्डा या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे जगदीप सिद्धू या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. नओमिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. नओमिकाची आई रिंकी खन्नाने अभिनेता गोविंदाच्या ‘जिस देश मे गंगा रहता है’ या चित्रपटात काम केले होते. मात्र रिंकी खन्नाला सिनेसृष्टीत फारसे यश मिळालेले नाही. Naomika Saran and Agastya Nanda | नओमिका सरन ही सोशल मीडियावर चर्चेत असते. तर अगस्त्य नंदाचा याआधी ‘द आर्चीज’ हा चित्रपट आलेला आहे. त्यानंतर आता लवकरच लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारलेल्या इक्कीस या चित्रपटातही तो दिसणार आहे. यात अगस्त्य धर्मेंद्र आणि जयदीप अहलावत सारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. Naomika Saran and Agastya Nanda | हेही वाचा: “धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे ‘दप्तर’, उद्या-परवा काढू” ; सुरेश धस आता आणखी कोणता गौप्यस्फोट करणार ?