Pimpri : महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा भव्य सत्कार; बाबा कांबळे यांनी भुषविले अध्यक्षपद

पिंपरी : महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड यांच्या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा कडाचीवाडी, गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान डॉ. बाबा कांबळे यांनी भूषवले.
कार्यक्रमात नरेंद्र गायकवाड, आनंद तांबे, आरटीओ अधिकारी विजय महाजन, विजय चव्हाण, संतोष गुंड, अनिल शिरसाठ, शुभम तांदळे, प्रदीप अय्यर, जाफर शेख, नंदू शेळके, सुरज सोनवणे, मोहम्मद शेख, प्रवीण शिखरे, संजय शिंदे, अविनाश वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबा कांबळे यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने २० वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा घेत रिक्षा परवान्यांपासून कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेपर्यंत विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. रिक्षाचालकांसाठी पेन्शन योजना, अधिकाऱ्यांच्या त्रासावर कारवाई आणि इलेक्ट्रिक रिक्षा संदर्भातील समस्या संघटनेतर्फे घेतल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील जाधव, राजू शिंदे, सुरज ठोंबरे, प्रकाश खंडेबराड, सचिन वलांडे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले.





