Nagar | महायुती सरकार पैशांनी बनलेले : आ. थोरात

नगर, (प्रतिनिधी)- राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिट अॅण्ड रन प्रकरण काय आहे. धनदांडग्यांचे मुले येता सर्वसामान्य लोकांना उडवून देतात. तसेच एक आमदार पोलीस ठाण्यातच गोळीबार करतो, अन् त्यांना वाचविण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहेत.
तसेच राज्यात प्रचंड अंम्लीपदार्थ वाढले आहेत. कायदासुव्यस्थेची परिस्थीती कठीण झाली आहे. अर्थव्यस्था बिघडली आहे. हे फक्त दोन वर्षात घडले असून राज्य मोडकळीस आले आहे. राज्यात महायुतीसरकाच्या काळात भ्रष्टाचार सुरु असून सरकारच पैशाचे बनले आहे, असा आरोप माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
राज्यासह देशात उन्मत सत्ता काय असते ती आपन पाहिली आहे. पैशाची घमंड असलेल्या सरकारला धडा शिकविण्याचे काम जनतेने लोकसभेला केले आहे. राज्याचे सरकार कसे सत्तेत आले हे सांगायची गरज नाही खोकेंची बाब गावपातळीवर पोहचली आहे.
तसेच ज्यांच्यावर आरोप झाले ते सत्तेत गेले. सत्तेत असलेल्या मंत्रीमंडळावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र सत्तेत गेली की आरोप थांबतात. हे लोकशाहीसाठी घातक आहे. जसे राज्यात सरकार बनले तसा कारभार खाली सुरु आहे. भष्टाचारासाठी प्रत्येक खात्यात चढाओढ लागली आहे, अशी टीका आ. थोरात यांनी केली.
मंत्रालय म्हणजे भष्टाचाराचा आगार: थोरात
जनतेचा पैसा कसा ओरबडता येइल अशी परिस्थीत सध्या राज्यात सुरु आहे. मंत्रालय म्हणजे भष्टाचाराचा आगार झाले आहे. ही वस्तूस्थीती आहे. कामा पेक्षा टक्केवारीची ओढाचढ सुरु आहे. काम कराणार, की नाही. अशी परिस्थीती राज्यात सुरु आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. दुर्देवाने हे सरकार आले. आणि चांगल्या राज्याची अशी परिस्थीती झाली.
सरकारच भ्रष्टाचाराचे बनले ; सर्वसामान्य जनतेने जायचे कोणाकडे
राज्यातील अनेक जमीन घोटाळे आम्ही विधानसभेत काढले. हजारो कोटींची जमीन आदाणींना कवडीमोल भावानी दिली. कुर्ला जमिन घोटाळा, पुणे येथील पशुसंवर्धन विभागाची जमिनीची हेराफेरी सुरु आहे.
त्यामुळे हे सरकार करतय तरी काय? असा सवाल त्यांनी केला. सरकारच भ्रष्टाचाराचे बनले आहे. हेराफेरीचे बनले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कोणाकडे जायचे असा सवाल ही थोरात यांनी केला.





