शिरूर : कोरेगाव भिमा येथील काळयांचा विशाल व सणसवाडी येथिल घोडक्यांचा गोविंद यांचे रोज नवनविन कारनामे समोर येत असून त्यांनी नोंदीसाठी अनेक नागरीकांना लुटल्याची खमंग चर्चा तालुकाभर चांगलीच रंगली आहे. हे तलाठी वरीष्ठांच्या आदेशालाही जुमानत नसुन नागरीकांना लुटतच आहे. सणसवाडी तलाठी कार्यालय व कोरेगाव भीमा तलाठी कार्यालय मधील अवैध नोंदी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम विरुद्ध कामकाजाबाबत सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप हे येत्या १० डिसेंबर पासून शिरूर तहसील कार्यालयात उपोषण सुरू करणार आहे. आता वरीष्ठ अधिकारी या लाचखोर तलाठ्यावर काय कारवाई हे पाहणे महत्वाचे ठरेल. तसेच त्यांचा त्या सजातून हकालपट्टी होण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे. हे तलाठी पैसे दिल्याशिवाय नोंदच करत नाही. त्यांनी लोंकाना लुटून ‘विशाल’ कमावलेल्या काळया पैश्याची लाल लुचपत विभागामार्फत चौकशी लावणार असल्याचेही सुभाष जगताप यांनी सांगितले आहे. याबाबत शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की प्रलंबित असणाऱ्या नोंदीचे काम प्रगतीपथावर असून सणसवाडी व कोरेगाव भिमा तलाठी यांना प्रलंबित नोंदींबाबत व गुंठेवारीच्या नोंदीबाबत खुलासा मागितला आहे.