Mozilla firefox alert: तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमध्ये Mozilla firefox वापरत असाल तर सावधान व्हा. कारण सरकारने याबाबत गंभीर इशारा जारी केला आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी सरकारने हा इशारा जारी केला असून सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने हा इशारा दिला आहे. CERT वेळोवेळी असे अलर्ट जारी करत असते. तर Mozilla Firefox बद्दल जारी केलेल्या या अलर्टबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
बग्समुळे अलर्ट जारी –
CERT-IN ने Mozilla Firefox बाबत हा इशारा जारी केला आहे कारण त्यात अनेक बग आहेत, ज्यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा चोरी होऊ शकतो आणि तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. तुम्ही Mozilla Firefox वापरत असल्यास, तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
Mozilla Firefox च्या या आवृत्त्यांमध्ये अधिक धोका –
CERT-IN च्या अहवालानुसार, Firefox ESR versions before 115.5.0, Mozilla Thunderbird version before 115.5 आणि Firefox iOS versions before 120 व्हर्जन वापरणे धोकादायक ठरू शकते. जर तुमच्याकडे हे व्हर्जन असतील तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण या व्हर्जनमध्ये बग आढळले आहेत.
वापरकर्त्यांनी त्वरित अपडेट करावे –
तुम्ही फायरफॉक्स वापरत असाल तर ते लगेच अपडेट करा, असे सुरक्षा एजन्सीकडून सांगण्यात आले. यासोबतच फायरफॉक्स ब्राउझरला ऑटोमॅटिक अपडेट सेट करण्यास सांगितले आहे. सुरक्षा एजन्सीने गेल्या काही दिवसांत अनेक अलर्ट जारी केले आहेत. अलीकडेच, Adobe ऍप्लिकेशनबाबत एजन्सीकडून अलर्टही जारी करण्यात आला होता.