Govinda Sunita Controversy: गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा; सुनीता आहुजांचा मोठा दावा, राखी सावंतसोबतच्या संभाषणाने वाढली खळबळ
Govinda Sunita Controversy राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती सुनीता आहुजा यांच्याशी फोनवर बोलताना दिसते. संभाषणादरम्यान गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेख झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Govinda Sunita Controversy: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सुनीता यांनी गोविंदासोबतच्या नात्याबाबत काही गंभीर दावे केले होते. त्यानंतर त्यांनी गोविंदाविरोधात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्जही मागे घेतला. आता अभिनेत्री राखी सावंतसोबतच्या एका फोनवरील संभाषणामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.
दुसऱ्या लग्नाचा प्लॅन असल्याचा दावा
राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती सुनीता आहुजा यांच्याशी फोनवर बोलताना दिसते. संभाषणादरम्यान गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेख झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुनीता यांनी राखीशी बोलताना आपण काही वर्षांपासून शांत होतो, मात्र आता परिस्थिती बदलल्याचं म्हटलं आहे. याच संभाषणात त्यांनी गोविंदा दुसरं लग्न करण्याच्या तयारीत असल्यामुळे आपण घटस्फोटाची केस मागे घेतल्याचा दावा केल्याचं वृत्त आहे.
मात्र, या दाव्याला गोविंदा किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सध्या ही माहिती सुनीता आणि राखी यांच्यातील संभाषणावर आधारित दावा म्हणूनच पाहावी लागेल.

Rakhi sawant reaction On Govinda Sunita personal Life controversy
राखीने सुनीताला दिला सल्ला
या संभाषणात राखी सावंत सुनीता यांच्या बाजूने बोलताना दिसते. तिने गोविंदाला ‘चीची भैया’ म्हणत आपण त्यांची चाहती असल्याचं सांगितलं. मात्र, एखाद्या कुटुंबात नेमकं काय सुरू आहे, हे बाहेरच्या व्यक्तींना पूर्णपणे माहिती नसतं, असंही तिने म्हटलं. राखीने सुनीता यांना त्यांच्या मालमत्तेबाबतही सावध राहण्याचा सल्ला दिल्याचं व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतं. त्यावर सुनीता यांनीही आपली बाजू मांडली.
घटस्फोटाचा अर्ज का मागे घेतला?
गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील तणावाच्या बातम्या यापूर्वीही समोर आल्या होत्या. सुनीता यांनी गोविंदाचं नाव कथितरित्या दुसऱ्या अभिनेत्रीशी जोडलं होतं. या चर्चांनंतर दोघांच्या नात्याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात होते.
दरम्यान, सुनीता यांनी गोविंदाविरोधात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर आता त्यांनी राखीशी केलेल्या संभाषणात केस मागे घेण्यामागचं कारण सांगितल्याचा दावा केला जात आहे.
View this post on Instagram
राणी स्वर्णकारसोबतही नाव जोडलं जातंय
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार गोविंदाचं नाव राणी स्वर्णकार नावाच्या अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. राणी गोविंदासोबत एका आगामी चित्रपटात काम करत असून, या चित्रपटातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि राणी यांना विमानतळावरही एकत्र पाहिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली. मात्र, या चर्चांवरून कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.
सध्या गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबाबत अनेक दावे आणि चर्चा सुरू आहेत. मात्र, दुसऱ्या लग्नाबाबत सुनीता यांनी केलेल्या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी संबंधित व्यक्तींच्या अधिकृत वक्तव्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.





