Devendra Fadnavis : स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांसाठी सरकारचं पुढचं पाऊल! CM फडणवीसांनी बळीराजासाठी केली मोठी घोषणा

Devendra Fadnavis : आज ७९ स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून ध्वजारोहन केले. यानंतर त्यांनी देशवासीयांसोबत संबोधित केले. पंतप्रधान यांनी त्यांच्या भाषणात काही योजनाही जाहीर केल्या आहेत. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहन केले. फडणीसांनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करताना स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरूवातीला महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली. ‘ऑपरेशन सिंदूर’चे विशेष कौतुक फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत आहे. भारताची अर्थव्यवस्था एका दशकात ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीवर भर दिला. जगातील सर्वोत्तम उत्पादने भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी घोषणा
त्यांनी आपल्या भाषणात अनेक घोषणा केल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आता ५ वर्षांसाठी मोफत वीज दिली जात आहे. तसेच दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प’ सुरू आहे, जो डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल.
यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास हरित वीज मिळेल, असं फडणीसांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. तसेच नदीजोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : FASTag Annual Pass : आजपासून फास्टॅगचा ३००० रुपयांचा वार्षिक पास सुरू; जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया आणि फायदे




