शेतकऱ्यांच्या समस्यांची सरकारला जाणीवसुद्धा नाही- शरद पवार

कोल्हापूर: भाजपा सरकारच्या काळात १५,९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या समस्यांची सरकारला जाणीवसुद्धा नाही. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या समस्यांना पाठींबा देण्याचे काम आजवर करत आलो आहोत. या सगळ्याची जबाबदारी धनंजय महाडिक व राजू शेट्टी चांगल्याप्रकारे पार पाडतील यात दुमत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्यावतीने राष्ट्रवादी चे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शरद पवार म्हणले, नरेंद्र मोदी वर्ध्याला प्रचारसभेत सहभागी झाले. अनेक नवीन घोषणांची अपेक्षा मी ठेवली होती. मात्र मोदींनी राष्ट्रवादी पक्षाचे चित्र जनतेसमोर मांडले. अजित पवार यांचे चुकीचे मतभेद समोर आणण्यात आले. अजित पवार एक तडफदार नेतृत्व असून त्यांची पक्षासंबंधी प्रामाणिक निष्ठा आहे.

त्याचबरोबर मोदी आपल्या प्रत्येक भाषणात गांधी परिवाराला हटवण्याचा मुद्दा मांडतात, मात्र गांधी घराण्याने देशाच्या हितासाठी केलेले बलिदान हे अविस्मरणीय आहे. गांधी परिवाराने आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही,असेही शरद पवार म्हणले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.